मुंबई : भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता भीषण आग लागली होती त्याचा धूर मॉलच्या शेजारी असलेल्या सनराइज या रुग़्णालयामध्ये पसरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ७० कोरोना बाधित रुग्णांना झाला. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या २२ गाड्यानी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळविला, त्या नंतर आग आटोक्यात आली. जेव्हा आग लागली तेव्हा रुग्णालयत ७० रुग्ण होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन शिड्यांच्या मदतीने खाली काढले. आग नेमक्या कोणत्या कारणामुळे लागली हे कळु शकले नाही.
आगीचे माहिती मिळताच मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, भाजपचे नेते किरीट सोमय्या, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घटना स्थळी भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी केली जाईल, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.