सोलापूर : सोलापूर पुणे महामार्गावरील लांबोटी जवळील जयशंकर हॉटेलचे मालक व जिल्हा परिषदेचे कामती गटाचे सदस्य तानाजी खताळ यांचे आज बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. सकाळी उठून झोपाळ्यावर बसले असता तेव्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे ते कट्टर समर्थक होते. भीमा आघाडी परिवार गटातून ते जिल्हा परिषद कामती गटातून विजयी झाले होते. तानाजी खताळ हे लांबोटी गावचे ते दहा वर्षे सरपंच होते. जय शंकर हॉटेल लांबोटी चिवडा आणि चहासाठी त्या मार्गावरील प्रसिद्ध असे हॉटेल आहे.