ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एनटीपीसीच्या निधी उपलब्धतेसाठी संयुक्त बैठक घ्या : आ.विजयकुमार देशमुख यांचे आयुक्तांना पत्र

सोलापूर दि.०३ एप्रिल : उजनी सोलापूर समांतर जलवाहिनीचा सोरेगाव ते पाकणी हा 17 कि.मीपैकी 14 किमी अंतराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पुढील टप्प्यांतील या जलवाहिनी प्रकल्पासाठी एनटीपीसीकडून निधीची नितांत गरज आहे. याबाबत चार महिन्यांपासून पाठपुरावा होऊनही स्मार्ट सिटीला निधी मिळाले नाही.ही निधी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन,स्मार्ट सिटी आणि एनटीपीसी यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी,असे पत्र आ.विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना दिले आहे.

उजनी ते सोलापूर या 110 किमीच्या समांतर जलवाहिनीचे 450 कोटींचे हे प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी एनटीपीसीकडून 250 कोटी रुपये देण्याचा करारही महापालिकेसोबत यापूर्वी झाला आहे.मात्र ही योजना स्मार्ट सिटीतून साकारण्यात येत असल्याने महापालिकेने एनटीपीसीकडून निधी उपलब्ध करून ती स्मार्ट सिटीकडे वर्ग करावे.सोरेगाव ते पाकणी हा 17 किमीचा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे.पाकणी ते टेंभुर्णी आणि टेंभुर्णी ते उजनी असे तीन टप्प्यांत हे काम पूर्ण होणार आहे.केंद्र व राज्य शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे.जलवाहिनीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी एनटीपीसीच्या निधीची निधीची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाच्यावतीने एनटीपीसीकडे गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे.

सोलापूर शहरासाठी अतिमहत्त्वाचा प्रकल्प असलेली ही समांतर जलवाहिनी निधी अभावी रखडण्याची शक्यता आहे.याकरिता त्वरित निधीची उपलब्धता करून देण्यासाठी महापालिका,स्मार्ट सिटी व एनटीपीसी यांची संयुक्त बैठक आयुक्तांनी घ्यावे,असे पत्र आ.विजयकुमार देशमुख यांनी मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांना दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!