ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन

मुंबई  दि.०४ एप्रिल: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी दिले होते.मात्र राज्यात पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका विरोधी पक्ष भाजपसह मनसेने घेतला होता.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करून केले होते. त्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या संवादाची माहिती महाराष्ट्र नव निर्माण सेनेकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

शिवाय मनसेकडून आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक पत्र पोस्ट करण्यात आले आहे. त्या पत्रात म्हंटले आहे की, आपण सर्वांनी सरकारी सूचनांच पालन कराव, सरकारी यंत्रणा संपूर्ण सहकार्य करावं, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्विटरवर करण्यात आली आहे.

राज्यात लॉकडाउन करण्यात येणार नसून ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. लॉकडाउनला अनेक मंत्र्यांनी विरोध दर्शवल्याने लॉकडाउन ऐवजी ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!