कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता गिरिकर्णिका फाऊंडेशनच्यावतीने व्हर्च्युअल वॉर रुमची स्थापना; रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना होणार मोठी मदत
सोलापूर दि.१७: दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या, सर्वत्र रेमिडिवीर इंजेक्शनचा तुटवडा, दवाखान्यात अपुरा पडणार्या बेड तथा प्राणवायु ह्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होणारी तारांबळ काही अंशी कमी करण्यासाठी तथा प्रशासनावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि स्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता गिरिकर्णिका फाऊंडेशनच्या वतीने व्हर्च्युअल वॉर रुम स्थापन करण्यात आले.
वॉर रुमच्या २४ तास कार्यान्वित केलेल्या नंबरवर संपर्कसाधून कोरोना विषयक जनजागृतीपर माहिती, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रमुख अधिकार्यांचे संपर्क क्रमांक, सोलापूरच्या हॉस्पिटल्सची सुयोग्य अपडेटेड खात्रीशीर माहिती व मार्गदर्शन मोफत देण्यात येणार असल्याचे गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी नमुद केले.
केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने कोरोना तथा लॉकडाऊन विषयी होणाऱ्या निर्णयांची माहिती प्रसार माध्यमातुन होत असूनही बहुतांशवेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची सुश्रुशा करण्याच्या व्यस्थतेत तो निर्णय, सुचना आणि मार्गदर्शन तत्त्वे पाहावयाचे राहुन जात असल्याने त्यांची तारांबळ उडते. एकाच नंबर वर कोरोना विषयक सर्व माहिती आणि मदत मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी सोय होणार आहे.
गिरिकर्णिका फाऊंडेशनच्यावतीने सोशल मिडियाच्या प्रभावी वापरातुन सोलापूरातील जनतेला शासनाच्या वतीने कोरोना पासून वाचवण्याकरता बचावात्मक उपाय तथा कोरोना विषयक नियमांचे पालन करण्या विषयी व्यापक प्रसिद्धी देण्यात येत आहे.
गिरिकर्णिका फाऊंडेशन संचलित सेव्ह सोलापूर सिटिझन फोरम व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातुन कोरोनाची दुसरी लाट थांबण्यासाठी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम सुयोग्य आणि यशस्वीपणे राबविण्यात आले. रेमिडिवीर आणि टॉसिलीझुमॅबच्या पुरवठा विषयी माहिती, अॅम्ब्युलन्स, सोलापूर शहराच्या हॉस्पिटल मधील उपलब्ध अॉक्शिजन बेड, कोव्हीड, नॉनकोव्हीड बेड, रूगणांच्या नातेवाईकांच्या स्वच्छता, नाष्टा, जेवण तथा राहण्याच्या सोयी, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, कोरोना टेस्टींगज सेंटर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे +९१-८७८८९४४०२४ ह्या संपर्क क्रमांकावर मिळतील असे आवाहन गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केले.