ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकमंत्री दत्तात्रय भरणे घेणार उद्या कोरोना आढावा बैठक

सोलापूर, दि. १७ : सोलापूर जिल्हा आणि शहरातील कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्या, रविवार, १८ एप्रिल रोजी बैठक घेणार आहेत.

पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू असल्याने पालकमंत्री भरणे यांच्या कार्यालयाकडून अशी बैठक घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यास भारत निवडणूक आयोगाने परवानगी दिली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आज कळविण्यात आले. त्यानुसार उद्या सकाळी अकरा वाजता नियोजन भवनाच्या सभागृहात ही बैठक होईल.

पालकमंत्री भरणे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती,रुग्णांची संख्या,उपलब्ध बेड,ऑक्सिजनची उपलब्धता,रेमडेसिव्हर इंजेक्शन आदीबाबत सविस्तर आढावा घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!