ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनाच्या काळामध्ये कामामध्ये हलगर्जीपणा, सोलापूरात दोन खाजगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

सोलापूर,दि.१८ : सोलापूर शहरात वाढता कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृत्यू दर ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून मृत व्यक्ती झालेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे.

आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी स्वतः मृत व्यक्ती यांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला किंवा त्यांना काही गंभीर आजार होता का याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर यांच्या क्लिनिकला भेट दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता आयुक्त पि. शिवशंकर सोलापूर महानगरपालिका यांनी सोलापूर शहरात डॉक्टरांसाठी आदेश निर्गमित केलेले असताना दि. १२ एप्रिल २०२१ रोजी एक रूग्ण (वय वर्ष- ८४)शांती नगर, विजापूर रोड ,सोलापूर सदर इसमास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ते निर्मल क्लीनिकचे डॉ. युवराज माने (वय -४४ वर्षे) राहणार नवीन आरटीओ जवळ सोलापूर येथे समक्ष जाऊन उपचार घेतले.डॉ. युवराज माने यांनी सदर रुग्णाची कोविड-१९ ची तपासणी केली नाही. तसेच सदर रुग्णाची माहिती महापालिकेच्या नागरिक आरोग्य केंद्रास दिले नाही.

तरी सदर इसमास श्वसनाचा त्रास होत असल्याने सदरचा इसम दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ९.२० मिनिटांनी ई.एस.आय हॉस्पिटल होटगी रोड सोलापूर शहर येथे कोविड वार्डात आंतररुग्ण म्हणून दाखल झाले. त्याच दिवशी सकाळी ९.५५ मिनिटांनी सदर इसमाचे निधन झाल्याचे डॉ.पी.आर नंदीमठ यांनी कळविले. त्याचे पोस्टमार्टम करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे त्यांची कोविड तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तरी निर्मल क्लिनिकचे डॉ. युवराज माने ( वय -४४)राहणार नवीन आरटीओ जवळ विजापूर रोड सोलापूर हे सदर इसमाचे तपासणीत हलगर्जीपणा केल्यामुळे आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर शहर तथा विशेष प्राधिकता कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उक्तीप्रमाणे निर्गमित केलेल्या वरील आदेशाचे उल्लंघन केले आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकी जवळ डॉ. जी.बी विश्वासे यांचे नित्यानंद दवाखाना आंध्र बँकेसमोर, रविवार पेठ येथे असल्याने त्याठिकाणी भेट दिली असता त्यांचा रजिस्टर चेक केल्याने अनियमित आढळून आले.त्यांच्या कडील आलेल्या पेशंटची माहिती व्यवस्थित देत नसल्याने तसेच सौम्य लक्षणे असलेल्या व माध्यम लक्षणे असलेल्या व्यक्तींची कोरोना तपासणी करण्याकरिता आरोग्य केंद्राकडे माहिती देत नसल्याने त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!