नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष चौधरी यांचं कोरोनामुळे निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी स्वत: गुरुवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद माहिती दिली.
सीताराम येचुरी यांचा ३५ वर्षीय मुलगा आशिष येचुरी करोना संक्रमित आढळल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते. ‘आज सकाळी मी माझा मोठा मुलगा आशिष युचेरी याला कोविड १९ संक्रमणामुळे गमावलं, हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे. ज्यांनी आमची आशा जिवंत ठेवली तसंच आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या डॉक्टर, नर्स, फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स, सॅनिटायझेशन वर्कस या सगळ्यांचेच मी आभार मानू इच्छितो’ असं सीताराम येचुरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.