ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मयुर शेळकेने दाखवलं माणुसकीचा दर्शन, रेल्वेकडून मिळालेल्या रकमेतील अर्धी रक्कम अंध मातेला देणार

मुंबई : काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात स्वत:च्या जीवाचा परवा न करता एका लहान मुलाचा जीव वाचवणाऱ्या जिगरबाज मयुर शेळकेचं सर्वत्र कौतुक होत असताना, आता त्याने घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यातील माणुसकीचं दर्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांपैकी २५ हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार  आहे अशी घोषणा मयूर शेळके यांनी केले आहे. त्याच्या या निर्णयामुळे परत एकदा त्याचे कौतुक होत आहे.

काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकात एक अंध आई आपल्या लहान मुलासह फलाटावरून चालत असताना तिच्या मुलाचा तोल जाऊन तो रेल्वे ट्रँकवर पडला. त्याचवेळी समोरून भरदाव वेगाने एक्सप्रेसही येत होती.

अशा प्रतिकूल परिस्थितीत अवघ्या ७ सेकंदात मयुर शेळके या जिगरबाज रेल्वे पाँईटमनने लहान मुलाचा जीव वाचवला. त्याच्या या कामगिरीबाबत केंद्रीय रेल्वे पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचं फोन करून कौतुक केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!