मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहे. यामुळे आज एकच खळबळ उडाली आहे. देशमुख यांच्या मालकीच्या १० ठिकाणांवर सीबीआयने छापे टाकले आहेत.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असूनही देशमुख यांच्यावर मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबईतील सुखदा, ज्ञानेश्वरी बंगला, वरळीतील निवासस्थानी सीबीआय पथकाकडून सकाळी ७ वाजल्यापासून छापेमारीची कारवाई सुरु आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात आत सीबीआयने एफआयआर देखील दाखल केले आहे.
याधाडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपावर निषणासाधला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बदनाम करण्यासाठी सुडाचे राजकारण केले जात आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या घरावर टाकलेल्या छापेमारीनंतर राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत.या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात तब्बल तीन तास बैठक झाली आणि या बैठकीत काय निर्णय घेण्यात आला या संदर्भात अद्याप माहिती मिळु शकली नाही.