ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती

मुंबई : राज्यात खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.या आदेशानुसार,नव्याने वितरीत होणारे लर्निंग व ड्रायव्हिंग लायसन्सची प्रक्रियाही ३० एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पुढील आदेश येईपर्यंत आरटीओंमध्ये अभ्यागतांना प्रवेश मिळणार नसल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवेतील वाहनांच्या नोंदणीस आरटीओंना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. याउलट खासगी वाहनांच्या नोंदणीस १ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाने ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत ३०जूनपर्यंत वाढवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!