सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दहा लाख कुटुंब दारिद्रय रेषेतून बाहेर पडतील … असा कोणता निर्णय आहे, क्लिक करा आणि पहा.
मुंबई,दि.८ : महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्वाची बातमी.ती म्हणजे राज्यातील महिला बचत गटांना राज्य सरकारने 523 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.
मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली. ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण व्हावे, यासाठी बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे. या बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात नवी तेजस्विनी योजना देखील राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना मोठा रोजगार मिळणार असून ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.या योजनेमुळे तब्बल दहा लाखापेक्षा जास्त कुटुंब दारिद्र्यातून बाहेर येतील, असेही त्या म्हणाल्या.