ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्टार मित्र सोलापूर मंडळातर्फे आयोजित शिबिरात ३१ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट, दि.४ : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे सोलापूरच्या स्टार मित्र मंडळाच्यावतीने आयोजित शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले.

सोलापूर येथील डाॅ.वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वापचार रुग्णालय, सोलापूर यांच्या संकल्पनेतून आणि पोलीस आयुक्त मुख्यालय सोलापूर शहर यांच्या परवानगीने स्टार मित्र मंडळाने सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघटक विक्रांत पिसे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पक्षाकडून रक्तदान शिबिरे राबवली जात आहेत.राज्यात कोरोनाचे संकट फार भयानक आहे,रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.रक्ताचा तुटवडा भासत आहे म्हणून ३१ जणांनी रक्तदान करून जनसेवा केली आहे.युवकांनी रक्तदान शिबिरे राबवून जनतेची सेवा करावी.रक्तदान हे श्रेष्ठदान आहे,असे पिसे यांनी सांगितले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी अशोक गुंड, सुरेश बालगांवकर, संतोष मंजुळकर, सतीश मंजुळकर, चंद्रकांत म्याकल, तिरुपती कनकुंटला ,मल्लू वळसंगे, करण कुराडकर, बाबा हिरापुरे, गोपी मंजुळकर, मयुर खत्री, आदित्य बालगांवकर यांचे योगदान लाभले.

सिव्हील रक्तपेढीचे पथक प्रमुख डाॅ.सरिता गोरे , मानसी बेंद्रे, पुजा तळेकर , श्वेता , राजू माने , वंदना तिनईकर , रुपाज॔ली माशाळकर , अमर रिजोरा आणि जयेश ओहोळ यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!