ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर,सत्ताधारी महाडिक गटाला मोठा फटका

कोल्हापूर : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा लक्ष लागुन राहीलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत.गोकूळ दूध संघात अखेर सत्तांतर झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाला मोठा फटका बसल्याचं पहायला मिळत आहे.सत्ताधारी महाडिक गटाची सत्ता विरोधकांनी उलथवली आहे. १७-४ अशा मोठ्या फरकाने विरोधी गटाने गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.विरोधी आघाडीतील १७ उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी दोन मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सभासदांनी मोठ्या उत्साहात मतदानात सहभागी होत मतदान केले होते. आज मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. सत्ताधारी महाडिक गटाकडून शाहू पॅनलखाली उमेदवार रिंगणात होते तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभे करण्यात आले होते.

महाडिक गटाला पराभूत करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाने वर्चस्व मिळवलं आहे. मतमोजणीच्या सुरूवाती पासूनच सतेज पाटील – हसन मुश्रीफ गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचं पहायला मिळालं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!