सांगली : काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह देशातील १२ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहेत.काँग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसह इतर नेत्यांनी या पत्राद्वारे देशातील कोरोना परिस्थिती आणि लसीकरणावर लक्ष वेधले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील सही आहे.तर राज्याचे माजी मुख्यमंत्री, तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहेत.भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले आहे.या पत्राचे उत्तर दिलं तर ठिक नाहीतर महाराष्ट्रातील जनता समजून जाईल असे टोला देखील पडळकर यांनी लगावला आहे.
या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांच्या राजकीय भूमिकेविषयी काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिली नाही तर जनता काय ते समजून जाईल, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना नुकतेच पत्र लिहून पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. मात्र, राजकीय तडजोडीमुळे भविष्यात त्यांचा ‘पाकधर्जिणा’ अशी ओळख असलेल्या नेत्यांमध्ये समावेश होण्याचा धोका आहे, असे वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.