ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील जिल्हाधिकार्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत ५० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून संवाद साधला आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यातील जिल्हाधकार्यांचं समावेश होता.

या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह १७ जिल्हाधिकारी देखील सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा आढावा घेतला. प्रधान सचिव राजेश भूषण आणि पंतप्रधान मोदी यांनी टेस्टिंग वाढवण्यच्या सूचना दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या कामाचं कौतुक केलं. त्यानिमित्ताने मोदींनी भोसले यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, या बैठकीत राजेश टोपे यांनी म्युकर मायकोसिसच्या इंजेक्शन बाबतची मागणी संदर्भात स्पष्ट भूमिका मांडली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जिल्हाधिकार्याना लस वाया न घालण्याचा सल्ला दिला.सोबतच  स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची आणि अनुभवाची शिदोरी पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याने त्याची नोंदी ठेवली जावे अशी सूचनाही त्यांनी दिली. जिल्ह्याच्या ज्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही तिथे तो होणार नाही. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे तिथे कडक उपाययोजनाद्वारे तो नियंत्रित करून जिल्ह्यातील गावे कोरोना मुक्त करावेत, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जिल्हाधिकर्याना दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!