अक्कलकोट: अक्कलकोट शहरात नगरपरिषदेचे विविध विकास कामे मुदत संपूनही गेल्या पाच वर्षापासून कासवगतीने कामे करणार्या ठेकेदारांचे व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून सदरील कामे दुसर्या ठेकेदारामार्फत करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार येणार असल्याचे रिपाइं तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी दिली आहे ते वार्ताहरांनी वार्तालाप करताना बोलत होते.
सोलापूर ते अक्कलकोट फोरलाईन राष्ट्रीय महामार्ग बांधणीचे कामास तीन वर्षाचे मुदत असतानाही सदरील काम ठेकेदाराने दोन वर्षात पुर्ण केलेला आहे. मात्र अक्कलकोट शहरात चालु असलेल्या विविध विकास कामे एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याच्या अटी असतानाही एक-एक कामाला पाच वर्षे पुर्ण होऊनही अद्याप काही ठेकेदारांनी कामे पूर्ण केलेली नाहीत.
शहरातील विविध विकास कामे नगरपरिषदेचे सत्ताधिकारी व विरोधक, बांधकाम कर्मचारी व अधिकारी यांनी संगनमत करुन ठेकेदाराच्या नावाने कामे घेवून गेल्या अनेक वर्षापासून कामे करीत असतात. यामुळे कोणीही कोणाच्या विरोधात बोलत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत काम होत नसल्यामुळे शहर वासियांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गेल्या पाच वर्षापूर्वी शहरवासियांना पाणीपुरवठा सुरळीत होण्याकामी नगरोत्थान या योजनेतून शहरात विविध ठिकाणी चार पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यासाठी एक वर्षात काम पूर्ण करण्याच्या अटीवर निविदा काढुन ठेकेदारास काम देण्यात आला. मात्र सदरील काम पाच वर्ष झाले तरी अद्याप पूर्ण न झाल्याने शहर वासियांना चार पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असतानाही जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे.
या कामा बरोबरच मंगल कार्यालय विविध ठिकाणी चाललेल्या सिमेंट काँक्रिट रस्ते, बंदिस्त गटार, शॉपिंग सेंटर, मुतारी, स्मशानभूमी व काही कामाचे काम करण्याचे मुदत संपूनही ठेकेदारांनी काम पूर्ण केलेला नाही. अशा ठेकेदारांना पाठिशी कोण घालत आहेत ही बाब गंभीर स्वरुपाचे व संशोधनात्मक विषय आहे. ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा कासवगतीने काम करणार्या ठेकेदार व त्यांच्या संस्थेचे नाव काळ्या यादीत टाकून दुसर्या ठेकेदारामार्फत काम करुन घ्यावे. मागील मंजूर झालेली कामे वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे आणखीन विविध विकास कामे वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे आणखीन विकास कामासाठी मंजूर झालेल्या चार कोटी रुपये लॅप्स होत असून ही संतापजनक बाब असून कासवगतीने काम करणार्या ठेकेदारांना वेळीच आवर घालण्यासाठी ठेकेदारांचे व संस्थेचे नाव काळ्या यादीत टाका अन्यथा आगामी काळात रिपाइं (आठवले गट) च्यावतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी वार्ताहराशी वार्तालाप करताना दिली.