ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हालचिंचोळी तलावाच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ,आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा

अक्कलकोट दि.२५ : अनेक वर्षांपासून बेदखल झालेल्या हालचिंचोळी येथील साठवण तलावाच्या स्वच्छता व डागडुजी कामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे भविष्यातील मोठा अनर्थ टळला आहे.
त्या कामाचा शुभारंभ आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.

हालचिंचोळी ता.अक्कलकोट येथील हद्दीत सन १९७२ मध्ये एक मोठा साठवण तलाव बांधण्यात आला होता. तेव्हा पासून आजपर्यंत या तलावाकडे संमंधित कार्यालयाकडून देखभाल दुरुस्ती झाले नव्हते. यामुळे तलावाला अनेक ठिकाणी भेगा पडलेले आहेत.

सर्वत्र झाडीझुडपी मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे कधीही तलावाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हते. जर धोका झाला तर गावाला फार मोठा फटका बसू शकतो. म्हणून मागील दीड वर्षा पासून सरपंच भीमाबाई बनसोडे यांनी पदाअधिकारी व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवले होते.

अखेर १५ दिवसापूर्वी आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या कडे गावचे शिष्टमंडळाने भेवून व्यथा मांडली. त्यावरून आमदार यांनी तात्काळ सदर परिस्थिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना प्रत्यक्षात भेटून तलावाची सर्व हकीकत सांगितले असता, जिल्हाधिकारी यांनी सदर विषय गंभीर्याने घेऊन तात्काळ कामास सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरून मंगळवार दि.२५ मे रोजी सकाळी आमदार कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते कामाचे शुभारंभ करण्यात आले.यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी प्रमुख उपस्थिती राहाऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. याप्रसंगी गावचे प्रथम नागरिक भीमाबाई बनसोडे, उपसरपंच श्रीसैल माशाळे, तंटामुक्त अध्यक्ष शिवगुंडा कोरे, मानव घोडके, किरण सुरवसे, शिवानंद राठोड,सतीश बनसोडे, धनंजय गाढवे, मलकारी बनसोडे, ग्रामसेवक कट्टीमनी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!