मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत १३ मिनिटांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संभाजीराजे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून मराठा समाजातील संघटनांशी ते चर्चा करत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते उद्या दुपारी तीन वाजता चर्चा करणार आहेत. मराठा आरक्षणप्रश्नीे पवार यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केल्याचे संभाजीराजे यांनी बैठकीनंतर माध्य मांशी बोलताना सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण नाकारल्याने सर्व समाज नाराज आहे. या प्रश्नात तुम्ही पुढाकार घ्या, अशी विनंती पवारांना त्यांनी केली. तसेच या प्रश्नात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. माझे सर्व म्हणणे त्यांनी ऐकूण घेतले. पवारसाहेब सकारात्मक आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली.
उद्या दुपारी मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका मांडेन, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.