दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मौजे धोत्री येथील ग्रामस्थ विजेच्या लंपडावामुळे त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून गावात दोन-दोन दिवस वीज गायब होणे, अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.या सर्व प्रकारच्या तक्रारींवर लवकरात लवकर तोडगा काढावे अन्यथा सर्व ग्रामस्थांवतीने जनआक्रोशी आंदोलन काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आली आहे.या संदर्भात दक्षिण सोलापूरच्या महावितरणच्या अभियंता यांना निवेदन देण्यात आली आहे.
सद्या लॉकडाऊनमुळे नोकरदारांचे वर्क फ्रॉम होम, विद्यार्थ्यांचे अॉनलाईन शिक्षण चालू आहे व शेतकऱ्यांचे पेरणी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही वीज महावितरण कंपनी कोणत्याही उपाययोजना करीत नाही.
कोरोनाच्या महामारीत ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले आकारली जात आहेत. ती कमी करण्यात यावीत यासाठी समस्यांनी त्रस्त असलेल्या धोत्री गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 1 जुन) येथील मा. कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय, सोलापूर (ग्रामीण) धडक देत दोन दिवसांत उपाययोजना केल्या नाहीत, तर तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यातून निर्माण होणार्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल, असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
वेळोवेळी आपणास त्यासाठी संपर्क करतो, परंतु आपण त्यावर कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. मागील आठवड्यात तर खूप वेळा रात्रभर वीज गायब होती. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आपणास मदत करू आणि उपाययोजना सुचवू पण आमच्या तालुक्याची विभागाची विजेची समस्या कायमस्वरूपी निकालात काढा. येत्या दोन दिवसांत विजेसंदर्भात उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
कोविडच्या काळात जी भरमसाठ बिले देण्यात आली ती कमी करण्यात येऊन जनतेला दिलासा देण्यात यावा. विजेच्या लपंडावाची समस्या निकाली निघाली नाही तर पुढच्या 15 दिवसांत धोत्रीतील जनतेच्या वतीने जनआक्रोश आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन सोलापूर ग्रामीण महावितरण कंपनीचे आतिरिक्त अधिकारी विजय सिंघल यांना देण्यात आले. या वेळी दिनेश मठपती व विनोद पोतदार उपस्थित होते. या आंदोलनातून निर्माण होणार्या परिस्थितीला महावितरण कंपनी जबाबदार असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.