ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तिसऱ्या दिवशीही रानगव्याची वनविभागाला हुलकावणी, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे भागात तीन दिवसांपासून रानगवा फिरत आहे.परंतु रान गवा मोठ्ठा जंगली प्राणी असल्यानेतो तिसऱ्या दिवशीही सापडू शकला नाही.आजही त्याने वन विभागाच्या पथकाला हुलकावणी दिली.त्यामुळेशे तकरी चिंतेत आहेत. त्याच्या यावा वरामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या तीन दिवसांपासून वन विभागात कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने मोठ्या प्रमाणात तालुक्यातील शिवसेना कार्यकर्ते सोबत घेऊन गव्याला शोधण्यासाठी शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे प्रयत्न करत आहेत.तालुक्यातील जनतेचे नुकसान होऊ नये म्हणून वनविभाग टिम‌ बरोबर काम ग्रामस्थ काम करत आहेत.आता आणखी वाट न बघता बाहेरून वनविभाग टिम‌ बोलावून लवकर जेरबंद करा,अशी मागणी ग्रामस्थांनी वन विभागाचे अधिकारी हक्के यांच्याकडे केली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत तालुक्यातील जनतेचे कुठल्याही प्रकारे नुकसान होऊ देणार नाही आणि वन्यजीव प्राणीमुळे शेतकऱ्यांचे व जनतेचे नुकसान झाल्यास ३५ दिवसात भरपाई करुन देण्याचे आश्वासन दिले.या पूर्वी या रान गव्याने कल्लहिपरगे शिवारात केलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मागणी यावेळी करण्यात आली.त्यावेळी पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केली असता मी लक्ष घालून कारवाई करेन व लवकरच गव्याला जेरबंद करु,असे आश्वासन ग्रामस्थांना त्यांनी दिले.

यावेळी पोलीस पाटील संतोष गुजा व अन्य गावकरी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!