पंढरपूर- शहरातील महाद्वार पोस्ट ऑफिस नुकतेच ग्रामसेवक पतसंस्था,उमदेगल्ली या नविन जागेत स्थलांतरीत झाले आहे. तेथील कामकाजाचा शुभारंभ अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक व पोस्ट फोरम सदस्य शशिकांत हरिदास व जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
मागील दिड वर्षापासुन महाद्वार पोस्टाची जुनी इमारत करार संपल्याने सोडावी लागणार असल्याने प्रदक्षणा मार्गावरील हे पोस्ट ऑफिस बंद होणार होते. त्यामुळे शहरातील मंदिर परिसर, प्रदक्षणा मार्गावरील नागरिकांना पोस्ट सेवेपासुन वंचित राहावे लागणार ही अडचण लक्षात घेऊन अ.भा. ग्राहक पंचायतीने त्याच परिसरात खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मागणी करुन जागा, इमारत मिळविण्याचा प्रयत्न केला.त्यास प्रतिसाद न मिळाल्याने महाद्वारातील पोस्ट ऑफिस नवी पेठ येथे स्थलांतरीत करावे लागले.ते गैरसोयीचे होते. प्रदक्षणा मार्ग, मंदिर परिसरातील ग्राहकांची गैरसोय लक्षात घेऊन अ.भा.ग्राहक पंचायतीने टपाल विभागाच्या मदतीने पुन्हा जागेचा शोध चालु ठेवला. त्यास यश येवुन ग्रामसेवक पतसंस्थेने त्यांची उमदेगल्ली येथील इमारत देवु केली. या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ नुकताच झाला.
प्रारंभी पोस्ट मास्तर श्रीमती एस. आर. मुजावर यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत केले. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजनपोस्ट फोरम सदस्य शशिकांत हरिदास यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी पोस्ट मास्तर श्रीमती एस. आर.मुजावर यांनी ग्राहकांना पोस्टाच्या सर्व सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील याची ग्वाही दिली. ग्राहक पंचायतीतर्फे पोस्टमास्तर श्रीमती मुजावर यांचा व सचिन खंदारे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ग्राहक पंचायतीचे तालुका कार्य.सदस्य दिलीप पाठक, जेष्ठ ग्राहक जयप्रकाश कोंडेवार, वृत्तपत्र लेखक संघटनेचे सुहास हरिदास,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड,गजानन मंगसुळे,पतसंस्थेचे महादेव माळी,भागवत बडवे, इ.उपस्थित होते.
या पोस्ट ऑफिसचे याच भागात स्थलांतर होणेसाठी टपाल कार्यालयाचे पूर्व अधिक्षक एन रमेश, अधिक्षक प्रमोद भोसले, सहा.अधिक्षक राजकुमार घायाळ, पूर्व निरिक्षक सोमनाथ गायकवाड, संदिप इमडे, नगरसेवक शैलेश बडवे, ग्रामसेवक पतसंस्थेचे चेअरमन काशिनाथ घोंगडे, सचिव महादेव भुसे, सचिन खंदारे भागवत बडवे यांचे सहकार्य लाभले.
ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरते,प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख,सचिव दीपक इरकल,तालुकाध्यक्ष अण्णा ऐतवाडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.