ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आनंदवार्ता…! मान्सूनचे देवभूमी केरळात आगमन

नवी दिल्ली : देशवासीयांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने गुरुवारी दिली आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे.

केरळच्या दक्षिणेकडील बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या सरी बरसत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून केरळात नैर्ऋत्य मान्सून दाखल होण्याची स्थिती निर्माण झाली होती.

केरळात ३ जून रोजी मान्सूनचे आगमन होईल, असे हवामान खात्याने ३१ मे रोजीच्या आपल्या सुधारित अंदाजात स्पष्ट केले होते. त्यानुसार आज अखेर मान्सून केरळात दाखल झाली आहे.

यंदा मान्सून केरळात किंचित उशिरा पोहोचला आहे. मान्सूनसाठी सध्या अतिशय पोषक स्थिती असून, आगामी दोन दिवसांतच तो केरळचा बहुतांश भाग व्यापेल आणि त्यानंतर त्याची पुढील वाटचाल सुरू होईल.

११ जून रोजी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे.देशात १०१ टक्के पावसाची शक्यता यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशभरात मान्सूनचा १०१ टक्के अर्थात्‌च समाधानकारक पाऊस पडेल, असा विश्‍वासही मोहपात्रा यांनी आज पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

१० तारखेपर्यंत गोव्यात येणार
हवामान खात्याच्या मते, १० जूनपर्यंत मान्सून गोव्यात आणि तळ कोकणात दाखल झालेला आहे.त्यानंतरच्या चार ते पाच दिवसांमध्ये तो महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापेल. यावर्षी राज्यात समाधानकारक पाऊस पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!