ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे ; उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि. ४ : ओबीसी समाजाचे हक्काचे आरक्षण परत देण्यात यावे, याकरिता भाजपा जिल्हा ओबीसी मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
यांना निवेदन पाठविण्यात यावे, असे
निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ढगे, अक्कलकोट ओबीसी सेलचे अध्यक्ष बसवंत कलशेट्टी, ओबीसी शहर अध्यक्ष प्रमोद कलशेट्टी, भाजपा
शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, माजी नगरसेवक सुनील गवंडी, जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे, माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, ग्रा.पं.सदस्य संतोष वाघे, संग्राम देशमुख, सुहास देशमुख, विनायक लोंढे, सुहास माळी, दिनेश डोके, संजय शेंडे यांच्यासह पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

सदर दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणा संदर्भाने काही आदेश दिलेले होते. लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन करावे, राज्यातील ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा जमा करुन तो तात्काळ न्यायालयास सादर करावा, न्यायालयाच्या या आदेशाला जवळपास दीड वर्षे झाले मात्र अजूनही साधे राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठन देखील केलेले नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.गेल्या दीड वर्षात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाच ते सातवेळा पत्राव्दारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे गांभीर्य लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला.

भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने अनेकवेळा पत्र दिले. मात्र राज्य शासनाकडून एकही उत्तर मिळाले नाही. लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करा, तसे झाले नाही तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. लाखोंच्या ओबीसी समाजा रस्त्यावर उतरेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला दिलेले हक्काचे आरक्षण आम्ही मिळवून राहू, आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या ह्काचे आरक्षण मिळणार नाही तोवर शांत बसणार नाही,असा इशारा या निवेदनात नमूद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!