ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुभेच्छा देताना चंद्रकांत पाटील यांना टोमणा मारला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

“आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे”, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वाघाशी मैत्री कधीही करु असं म्हंट्ल्यानंतर हा विषय पेटला आहे. यावर संजय राऊतांनी वाघ मैत्री करत नाही. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊतांच्या या व्क्तव्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा पलटवार केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!