ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संशोधन क्षेत्रात शिवपुरीने टाकले नवे पाऊल, अल्कोहोल विरहित सॅनिटायझरच्या निर्मितीस प्रारंभ, तीन उत्पादने झाली विकसित

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१० : शिवपुरीचे नाव अग्निहोत्र आणि इतर उत्पादनामुळे
जगभर पसरलेले आहेच परंतु आता
कोरोना संकटातही त्यांनी एक नवे संशोधन केले असून याद्वारे अल्कोहोल विरहित हँड सॅनिटायझरची निर्मिती करून संशोधनाच्या क्षेत्रात नवा उच्चांक गाठला आहे.

 

अग्निहोत्र केल्यानंतर जे भस्म राहते त्यावरती संशोधन करून शिवपुरीच्या विश्व फाउंडेशनने ही तीन उत्पादने तयार केली आहेत आणि त्याच्या निर्मितीलाही आता
प्रारंभ झालेला आहे,अशी माहिती विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी दिली.

अक्कलकोट पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवपुरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून अग्निहोत्राचे प्रचारकार्य जगभर सुरू असते परंतु मागच्या दोन वर्षात कोरोना संकटाने संपूर्ण जगाला घेरले आहे, अशा परिस्थितीमध्ये डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी याबाबत संशोधनाची भूमिका ठेवून या नव्या उत्पादनाची निर्मिती केली आहे. ही उत्पादने हानिकारक विषाणूंचा व जीवाणूंचा प्रतिकार करणारी क्षमता असलेली आहेत.यात प्रामुख्याने हँड सॅनिटायझर, सरफेस क्लिनर त्याशिवाय फळे आणि भाजीपाला स्वच्छ धुवण्यासाठी लिक्विड तयार करण्यात आले आहे.यातून मानवाला विषाणूपासून खूप मोठ्या प्रमाणावर संरक्षण मिळत असल्याचे
सिद्ध झाले आहे त्यामुळे शिवपुरीने अशा प्रकारच्या उत्पादनाला चालना दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

यासाठी जळगाव येथील संशोधक डॉ.निलेश तेली यांची मदत घेण्यात आली आहे. मागच्या सहा महिन्यांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते प्रायोगिक स्वरूपात त्याला यश प्राप्त झाल्यानंतर त्याच्या उत्पादनाची सुरुवात करण्यात आली आहे. संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी शिवपुरी येथून एक वेगळा विचार संपूर्ण जगाला मिळतो आणि याला वैज्ञानिक आधार आहे म्हणून लोक येथील उत्पादनाकडे मोठ्या विश्वासाने पाहतात. याचा विचार करूनच डॉ. राजीमवाले आणि डॉ.तेली यांनी संशोधनातून अग्निहोत्र भस्म वापरून या उत्पादनांची निर्मिती केली आहे. या हँड सॅनिटायझर मार्फत एकूण अकरा प्रकारच्या विषाणूंचा प्रतिकार चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि त्याची टक्केवारी ही ९९ टक्के इतकी असल्याचा दावा विश्व फाऊंडेशनने केला आहे.

अग्निहोत्राचा जर प्रामुख्याने विचार केला अग्निहोत्रामध्ये एक तांब्याचे पात्र असते त्यामध्ये गायीच्या शेणाच्या गोवऱ्या, गाईचे तूप आणि तांदूळ असते. सूर्यास्त आणि सूर्योदय या दोन्ही वेळेला हे अग्निहोत्र केले जाते. त्यामुळे या मूळ प्रक्रियेतून संशोधन करून हे यश संस्थेने मिळवले आहे.याच्या वापराने नैसर्गिक आनंद आणि शुद्धतेचा अनुभव घेऊन शरीराला अनावश्यक आणि धोका पोहोचवणाऱ्या घटकांना या माध्यमातून दूर ठेवता येणार आहे,

हे संशोधनाअंती सिद्ध करून दाखवले आहे.या उत्पादनांमध्ये अग्निहोत्राचा भस्माचा वापर करण्यात आला आहे आणि ही उत्पादने संपूर्ण अल्कोहलमुक्त आहेत.शरीराला त्याचा कोणताही धोका नाही तसेच व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी ९९ टक्के त्याची क्षमता आहे,असा दावाही डॉ. निलेश तेली यांनी केला आहे.

बाजारात आज अल्कोहोल युक्त अनेक सॅनिटायझर आले आहेत अशा परिस्थितीमध्ये शिवपुरीच्या विश्व फाउंडेशन ने तयार केलेली अल्कोलविरहित सॅनिटायझरची तीन उत्पादने नक्कीच कोरोना संदर्भातील पुढील उपाययोजनाना नक्की बळ देतील आणि संशोधनाला चालना देईल,अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

★साईड इफेक्ट्स नाहीत

कोरोना विषाणू जगभरात थैमान घातल्यानंतर अनेक शास्त्रज्ञ लोक या व्हायरसवरती मोठ्या प्रमाणात काम
करत आहेत त्याचे पुढचे पाऊल म्हणून शिवापुरीने सॅनिटायझरच्या बाबतीत संशोधन करून ती उत्पादने पुढे आणली आहेत.याचा फायदा निश्चितच मानव जातीला होईल. विशेषता याचे साईड
इफेक्ट कुठलेही नाहीत त्यामुळे हे
प्रत्येकाने वापरले पाहिजे -डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले,अध्यक्ष विश्व फाऊंडेशन, शिवपुरी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!