ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना अटक

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढ झाली आहे. सक्तवसुली संचलनालयाने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबईतील निवास्थानी छापेमारी केली होती. तर आज ईडीने त्यांच्या स्वीय सहायकांना अटक केली आहे. संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे अशी त्यांची नावे आहेत. या दोघांनाही ईडीने काल शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरावर सक्तवसुली संचनालयाने काल छापेमारी केली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे ठाकले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपचे नेते माजी खासादार किरिट सोमय्या यांनी या संदर्भात ट्विट करुन माहीती दिली आहे. ‘वाझे प्रकरणी अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना आज ईडीकडून अटक करण्यात आली. आता पुढील काही दिवसांत अनिल देशमुख यांनादेखील अटक होईल.’ असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!