ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हरिभाई देवकरन प्रशालेसमोर गुडघाभर पाणी, सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी

सोलापुर – शनिवारी सायंकाळी पडलेल्या धुवाधार पावसाने हरिभाई देवकर प्रशाले समोरील रस्त्यावर अक्षरशः गुडघाभर पाणी साचले होते. नागरिकांना त्या पाण्यातून जाण्यास कसरत कारावी लागत होती. या ठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत येथे नवीन पूल बांधण्यात आला आहे. पाऊस पडल्यानंतर अर्ध्या तासात रस्त्यावर दिसणार नाही असा दावा करणारे अधिकारी सपशेल खोटे ठरलेले आहेत. याच वेळी सभागृह नेत्यांना काही नागरिकांनी याबाबत फोन करून तक्रार केल्याने त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन तेथील पाहणी केली. लागलीच सभागृह नेत्यांनी स्मार्टसिटीचे सीईओ यांच्यासह अधिकाऱ्यांना फोन केला. अर्धा तास झाला तरी एकही अधिकारी घटनास्थळी उपस्थित झालेले न्हवते काहीवेळाने एक अधिकारी तेथे आल्यानंतर त्याची सभागृह नेत्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.

खरतर हे पाणी ग्रेव्हीटीने जायला पाहिजे याचे मूल्यांकन झाले पाहिजे होते. करोडो रुपये खर्चून ग्रेव्हीटीने पाण्याचा निचरा का होत नाही याची चौकशी मी करणार आहे. आपत्कालीन व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत मी हा विषय सर्वसाधारण सभेत घेऊन दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कामचुकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे असे मत सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!