दुधनी : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारने एस.टी.बंद केले होते. सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव थोडाफार कमी झाल्याने परिस्थिती हळू-हळू पूर्व पदावर येत आहे. या पार्श्वभूमीवर दुधनी-भिवंडी या नव्या बस सेवेचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या हस्ते, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या प्रमुख्य उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी अक्कलकोट बस स्थानकाचे आगार प्रमुख रमेश म्हंथा, वाहतूक नियंत्रक संभाजी पवार, आडत भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, शिवानंद माड्याळ, शिवशरणप्पा हबशी, शंकर भांजी, लक्ष्मीपुत्र हबशी, उदयकुमार म्हेत्रे, स्थानक प्रमुख जयसिंह चव्हाण, दुधनी बसस्थानक वाहतूक नियंत्रक प्रियांका कोलाटी, माजी वाहतूक नियंत्रक इरय्या स्वामी, चालक बसवराज पाटील, वाहक रमेश पाटील, आणि इतर नागरिक उपस्थित होते.