ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घ्या , पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

सोलापूर,दि.30: केंद्र शासनाने 2020-21 या वर्षांपासून पशुसंवर्धन संदर्भातील व्यवसाय करणाऱ्यासाठी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना सुरू केली आहे. योजनेचा लाभ व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कंपन्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एन.ए. सोनवणे यांनी केले आहे.

योजनेंतर्गत दूध प्रक्रिया (आईसक्रीम, चीज निर्मिती, दूध पाश्चराईजेशन, दूध पावडर), मांस निर्मिती आणि प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या व्यावसायांना 90 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेमध्ये व्याजदरात तीन टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबरोबर बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातीचे संवर्धन यांचाही समावेश आहे.

योजनेच्या मार्गदर्शक सूचना केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या संकेतस्थळावर (http://dahd.nic.in/ahdf) उपलब्ध असून राज्य शासनाच्या http://ahd.maharashtra.gov.in लिंक देण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचना मराठीमध्ये असणार आहेत.

जिल्ह्यातील व्यक्तीगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कंपन्यांनी घेण्याचे जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सोनवणे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!