ठाकरे गटाला मोठा धक्का ; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास न्यायालयाने दिला नकार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली ‘’ही’’ प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर व निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला बहाल करण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला होता. त्यानंतर ठाकरे गटाकडून आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु आता कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कोर्टानं निवडणूक आयोगाच्या निकालाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपात्रतेसंदर्भात जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही, तोपर्यंत इतर कुठल्याही यंत्रणेला हस्तक्षेप करता येत नाही, असे त्यांनी म्हंटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावर जर तो घटनाबाह्य असेल किंवा नियमबाह्य असेल तर या संदर्भातील दखल उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात मागू शकता. निर्णय होत नाही तोपर्यंत कुठलेही कोर्टाला यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही असे मला वाटते आणि तशीच भूमिका आज न्यायालयातही घेण्यात आली, असे राहुल नार्वेकर यांनी म्हंटले आहे.