मुंबई : महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश ठाकरेंसाठी मोठी धक्का मानला जात आहे. कृष्णा हेगडे शिंदे गटात प्रवेश करताच त्यांना उपनेतेपद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काल आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी आपल्या समर्थकांसह आज #बाळासाहेबांची_शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #BalasahebanchiShivsena pic.twitter.com/D3E3AC37Z4
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 28, 2022
शिंदे सरकार ठाकरे गटाला वारंवार धक्क्यांवर धक्के देत आहे. शिवसेनेत फूट पाडल्यानंतर अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता अजून एक मोठा धक्का ठाकरे गटाला बसला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुंबईतील विलेपार्ले भागात कृष्णा हेगडे यांचा बालेकिल्ला आहे.