अक्कलकोट शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत रिपाई व रासपचे पोलीस निरीक्षक यांना दिले निवेदन
अक्कलकोट : अक्कलकोट शहरांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी सुट्टी संपल्याने श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी स्वामी भक्त मोठ्या प्रमाणात अक्कलकोटला येत आहेत. त्यामुळे बसस्थानक परीसर, मेन बाजार पेठ, तुप चौक, फत्तेसिंह चौक, एवन चौक, बेडर कनय्या चौक, भीम नगर मैंदर्गी रोड, भक्तनिवास परिसर या परीसरात वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याबाबत रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी आज उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांना निवेदन दिले.
याप्रसंगी रिपाइंचे अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार, रासपचे शहर अध्यक्ष स्वामीराव घोडके, रिपाइंचे शहर युवक अध्यक्ष शुभम मडिखांबे, राहुल रुही,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सैपन शेख सुरेश सोनकांबळे अक्षय गायकवाड,आदी उपस्थित होते. तरी वाहतुक कोंडीमुळे स्वामी भक्तांना तसेच शहरातील नागरिकांना याचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी वाहतुक कोंडीमुळे दवाखान्यात घेऊन जात असलेल्या पेशंट व रुग्णवाहिका तसेच लहान मुलांचे गैरसोय होत आहे.
वाहतुक कोंडीमुळे अनुचीत घटना घडली तर त्यास जबाबदार कोण आहेत. म्हणून अक्कलकोट शहरात आलेल्या स्वामी दर्शनासाठी आलेले स्वामी भक्तांचे दर्शनासाठी थांबलेल्या रांगांमध्ये धक्काबुक्की चेंगराचेंगरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व कारणांमुळे स्वामी भक्त व दुकानदारांमध्ये नाराजी व्यक्त केले जात आहे.
वाहतुकीची कोंडी जाम झाल्यामुळे अक्कलकोट शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे. तरी मंदिर देवस्थान समीती व पोलीस प्रशासनाने चारचाकी वाहनांची पार्किंगची सोय केल्यास गैरसोय टाळण्यात येईल. तसेच मंदिर समीतीने त्यांचे कर्मचारी वर्गांना उपाययोजना करण्याबाबत सुचना द्यावी. तसेच पोलीस प्रशासनाने देखील त्वरित उपाययोजना करुन भक्तांची तसेच नागरीकांची सोय करावी. येत्या आठ तारखेपर्यंत सुट्टी असल्याने अक्कलकोटला गर्दी होणार आहे. तरी पुढील होणाऱ्या गैरसोयीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशा प्रकारचे निवेदन अक्कलकोट तालुका अध्यक्ष रिपाईंचे अविनाश मडिखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या वतीने करण्यात आली आहे.