ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बोरी उमरगे येथे रिव्हॉल्व्हर व काडातुसांसह १५ हजारांची रोकड लंपास केलेल्या आरोपीस अटक

सोलापूर : फिर्यादी नामे अशोक एकनाथ कु-हाडे वय ५३ वर्षे राहणार पौड ता. मुळशी जि. पुणे हे दिनांक ०७ / ११ / २२ रोजीचे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थांचे पालखी दिंडीतून भावीकासह पायी चालत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदीर अक्कलकोट येथे देव दर्शनासाठी आले होते. पौर्णिमे दिवशी सायंकाळी त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेवून झालेवर पुन्हा एकटेच पायी चालत अक्कलकोट ते गाणगापूर जाणारे रोडने गाणगापूर येथे श्री गुरुदत्त देव दर्शनासाठी जात असताना रात्री अंधार झाल्याने बोरी उमरगे ता अक्कलकोट येथील श्री लक्ष्मी मंदीरात मुक्काम केला.

मंदीरामध्ये रात्री ०९ वाजता मुक्कामाचे ठिकाणी झोपताना अशोक कु-हाडे यांनी त्यांचे सोबत असलेले परवानाप्राप्त रिव्हॉल्वर त्यामध्ये ६ जीवंत काडतुसे व रोख रक्कम १५ हजार रुपये त्यांचे जवळील सॅकमध्ये ठेवून ती उशाला घेवून झोपले होते. त्यानंतर दुसरे दिवशी दिनांक ०८ / ११ / २२ रोजी पहाटे ०४ वा. सुमारास ते उठले असता त्यांचे उशाला असलेली सॅक ही त्यांचेपासून १० फुट लांब अंतरावर पडलेली त्यांना दिसली.

अशोक कु-हाडे यांनी सदरची सॅक घेवून तपासून पाहीली तेंव्हा त्यांनी सॅकमध्ये ठेवलेले रिव्हॉल्वर ६ जीवंत काडतुसासह तसेच रोख रक्कम १५ हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरीन नेल्याचे त्यांचे लक्षात आलेने त्यानी तात्काळ गावातील काही लोकांना मंदीरातील पुजारी यांना जागे करुन विचारपूस केली परंतु त्यांचेकडून काही माहिती मिळाली नाही. त्यानंतर अशोक कु-हाडे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेस जावून त्यांची रिव्हॉल्वर ६ जीवंत काडतुसासह तसेच रोख रक्कम १५ हजार रुपये रात्रीचे सुमारास लक्ष्मी मंदीर बोरी उमरगे येथून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेलेबाबत फिर्याद दिली होती.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्रसिंह गौर साहेब व पोलीस निरीक्षक श्री प्रदीप काळे सो गुन्हयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक सिद्राम धायगुडे पोहेकॉ अजय भोसले, पोहवा अरुण राउत चालक चापोकों विजयकुमार मल्लाड यांना सोबत घेवून तात्काळ घटनास्थळी भेट देवून गुन्हा घडले ठिकाणची पाहणी करुन जलद तपास सुरु केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!