ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पक्ष चिन्ह आणि नाव मिळाल्याने शिंदे गटाने विधान परिषदेत आपला प्रदोत नेमला ; ठाकरे गटाची कोंडी

मुंबई : पक्ष चिन्ह आणि नाव मिळाल्याने आता शिंदे गटाने विधान परिषदेत आपला प्रदोत नेमला आहे. यामुळे आता त्यांचा आदेश उद्धव ठाकरे यांना मानावा लागणार असल्याने यावरुन देखील आता संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब हे प्रतोद आहेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या पत्रानंतर मोठी कोंडी निर्माण होणार आहे.

राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार पासून सुरू झाले आहे. दरम्यान, या अधिवेशातही आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे विधान परिषदेतही आता राजकीय संघर्ष उफाळणार आहे. या प्रदोत नेमणुकीमुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहे. प्रतोद नेमल्यानंतर पक्षाची अधिकृत भूमिका घेण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा होणार आहे. जर शिंदे गटाच्या प्रदोतने व्हीप काढल्यास सर्व आमदारांना तो मान्य करावा लागणार आहे. असे न झाल्यास त्यांच्यावर आपत्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे पक्ष चिन्ह आणि नाव दिल्याने आता शिंदे गट चांगलाच सक्रिय झाला आहे. विधान सभेत सर्व आमदारांना व्हीप बाजवल्या नंतर आता त्यांनी नवी खेळी केली आहे. यात उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधान परिषदेत आपला प्रदोत नेमण्यासाठी त्यांनी उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. शिंदे गटाचा प्रतोद झाल्यास खुद्द उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांचा ‘आदेश’ मानावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!