मुंबई : कथित पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी तब्बल १०२ तुरुंगात असलेले शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पाठीमागे लागलेली ईडीची पिडा थांबण्याचा नाव घेत नाहीये, खासदार संजय राऊत यांना ईडीकडून पुन्हा नोटीस आली असून १८ नाेव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
खासदार संजय राऊत यांना तब्बल १०२ दिवसांनंतर पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करताना चौकशीसाठी व तपासासाठी सहकार्य करावे, अशी अट घातले होती. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणाची तपास ईडीने पुढे सुरू ठेवला आहे.
संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात सुधारित याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत २५ नोव्हेंबरपासून सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.