ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत अक्कलकोटमध्ये वृक्षलागवडीद्वारे प्रबोधन ; स्त्री जन्माचे अनोख्या पध्दतीने केले स्वागत !

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२१ : महिला व बालविकास विभागामार्फत मुलींच्या लिंगगुणोत्तर वाढीसाठी जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजना राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू असून असाच एक उपक्रम अक्कलकोट प्रकल्पातील पर्यवेक्षिका अश्विनी चटमुटगे
यांनी राबविला आहे.त्यांनी मुलीच्या जन्माप्रीत्यर्थ स्त्री जन्माचे स्वागत म्हणून चपळगाव विभागातील ५९ अंगणवाडी केंद्रांना पपईच्या रोपांची भेट दिली आहे.
त्यांनी कृतीतून दाखविलेल्या या अनोख्या उपक्रमात प्रशासनात चर्चा आहे.

सध्या पावसाळा असून शासनाचे झाडे लावा झाडे लावा हे अभियान केवळ कागदावरच न राबविता चटमुटगे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची झाडे लावा झाडे जगवा अभियानाशी उत्तम सांगड घालून त्यांच्या अंगणवाडी केंद्रांना पपईचे रोप देऊन एक समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण केला आहे.याबाबत बोलताना चटमुटगे म्हणाल्या की,समाजात एवढे कायदे कठोर होऊनही
स्त्री -भ्रूण हत्या वाढतच आहेत याला आपण स्वतः पण तितकेच जबाबदार आहोत.स्त्री- भ्रूण हत्या कमी करण्यासाठी आपले स्वतःचे विचार बदलण्याची गरज आहे.ती होऊ नये म्हणून जनजागृती करण्याची गरज आहे.आपला खारीचा वाटा म्हणून हा उपक्रम राबविला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव,स्वरांगी गायकवाड,रविंद्र माळगे,मिनाक्षी चटमुटगे यांच्यासह चपळगाव विभागातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!