अक्कलकोट, दि.१४ : अक्कलकोट नगरपालिका निवडणुकी संदर्भात एक महत्त्वाची बैठक आज सायंकाळी ६ -३० वाजता अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात बोलावण्यात आली आहे.
बैठकीत काँग्रेसची दिशा स्पष्ट होणार आहे तसेच संभाव्य इच्छुक उमेदवारांवर ही चर्चा होणार आहे. या बैठकीला जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे मार्गदर्शन करणार आहेत.तरी सर्व आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित रहावे,असे आवाहन काँग्रेस कार्यालयाच्या सूत्रांनी केले आहे.