अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यात अक्कलकोट स्टेशन येथे रेल्वे विभागात काम करणारे ५२ मजूर पॉझिटिव निघाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या २५८ इतकी झाली आहे.सोमवारी अक्कलकोट स्टेशन येथे रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम सुरू आहे.त्या ठेकेदाराकडे जवळपास २०० मजूर करतात.त्यापैकी १२ जणांना पहिल्या टप्प्यात लागण झाली होती.त्यानंतर
आज त्यांच्या संपर्कातील १७६ जणांच्या दोन्ही तपासण्या करण्यात आल्या.त्यात ४० जण पॉझिटिव्ह आले आहेत
तर बाकीच्या लोकांची आरटीपीसीआर
टेस्ट करण्यात आली आहे.ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे त्यांना प्रशासनाने क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.
बाकीच्यांचा अहवाल येत्या दोन दिवसात येणार आहे.अक्कलकोट रेल्वे स्टेशन येथे परराज्यातील २०० जणांची मजुराची टोळी आहे त्यामध्ये आतापर्यंत तब्बल ५२ जण निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.आज दिवसभर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विन करजखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर सायंकाळी हे चित्र स्पष्ट झाले. तालुक्याच्या उर्वरित भागात २३ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.यामध्ये अक्कलकोट शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे.यावरून ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे हे सिद्ध होत आहे.एकूण तालुक्याचा विचार केला तर अक्कलकोट शहरांमध्ये एकूण ६० रुग्ण पॉझिटिव्ह
आहेत तर ग्रामीण मध्ये १९८ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी दिली. यामध्ये सीसीसी सेंटरमध्ये
१९० तर डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये ११ जण उपचार घेत आहेत.आज जे ६३ पॉझिटिव आलेले आहेत त्यांना सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना फारशी लक्षणे नाहीत परंतु त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे त्यांची प्रकृती स्थिर आहे.मजुरांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन त्यांनी केले आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने सर्वांनी काळजी घ्यावी, घराबाहेर कोणीही विनाकारण पडू नये, मास्क,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चारवरून संख्या
झाली चाळीस !
सोमवारी सर्दी, खोकला, ताप या तीन प्रकारची लक्षणे असलेल्या तीन -चार मजूर ग्रामीण रुग्णालयात आले होते.त्यानंतर येथील पथकाने त्यांची तपासणी केली ते पॉझिटिव निघाल्याने त्यांच्या संपर्कातील रुग्णांची तपासणी केली असता सोमवारी १२ तर मंगळवारी ४० पॉझिटिव आले. त्यानंतर प्रशासनाने या सर्वांना सीसीसी सेंटरमध्ये हलवले आहे.