मारुती बावडे
अक्कलकोट, दि.३१ : पंचतारांकित हॉटेलच्या धर्तीवर अक्कलकोट शहरात प्रथमच हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्यूटिव्ह या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन सोहळा उद्या गुरुवार दि.१ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे,अशी माहिती मॅनेजिंग डायरेक्टर एजाज मुतवल्ली यांनी दिली.अक्कलकोट शहराचा वाढता विस्तार आणि व्हीआयपी भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्याधुनिक अशा पद्धतीच्या सोयी सुविधा देऊन या हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.या हॉटेलमध्ये एक्झिक्यूटिव्ह, प्रीमियम आणि सूट अशा
तीन प्रकारच्या ३६ रूम्स उपलब्ध आहेत.
या सर्व रूम वातानुकूलित असून प्रशस्त पार्किंग, स्वतंत्र स्वागत कक्ष अशा पद्धतीची रचना असलेले हॉटेल अक्कलकोट शहराचे लक्ष वेधून घेत आहे.१० हजार चौरस फुटामध्ये बांधण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये लक्झरी एलिमेंट प्युअर व्हेज रेस्टॉरंटची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे हे देखील अक्कलकोटमध्ये आता आकर्षणाचा विषय बनला आहे तसेच एमबॉसीस द पार्टी हॉल
या अंतर्गत किमान शंभर लोकांसाठी मीटिंगची व्यवस्था, बर्थडे पार्टी ,एक्जीबिशन हॉल म्हणून तसेच गेट-टुगेदर, बफे सिस्टीम जेवणासाठी देखील आकर्षक हॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे.शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी हे हॉटेल असून स्वामी समर्थ मंदिरापासून ६०० मीटर अंतरावरती ए- वन चौकाजवळ हे हॉटेल उभारण्यात आले आहे.
अक्कलकोटमध्ये दिवसागणिक भाविकांची संख्या वाढत चाललेली आहे या पार्श्वभूमीवर त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा पाहता अशा प्रकारच्या हॉटेलची अक्कलकोटला नितांत गरज होती त्यादृष्टीने आपण प्रयत्न केला असल्याचे मुतवल्ली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.प्रत्येक रूम्समध्ये फ्री वायफाय, एलईडी स्मार्ट टीव्ही, लिफ्टची सोय प्रत्येक रूममध्ये तातडीची सुविधा, तापमान नियंत्रित रूम्स यासारख्या सुविधा २४ तास उपलब्ध राहणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी हॉटेलचे चेअरमन इम्रान मुतवल्ली,संचालक नसरोद्दीन मुतवल्ली,अमीन मुजावर,रोहन पवार,समीर खान आदि उपस्थित होते.
हॉटेल भाविकांचे आकर्षण
अक्कलकोट शहरामध्ये ए- वन चौकापासून
ते मंगरुळे बायपासच्यामध्ये डाव्या बाजूला रस्त्यालगत हे हॉटेल असल्याने अक्कलकोट सह भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.दर्जेदार सुविधा, उत्तम व्यवस्था,प्रशिक्षित स्टाफ हे या हॉटेल फोर पेटल्सचे एक्झिक्यूटिव्हचे खास वैशिष्ट्य असून याचा शहरातील नागरिकांसह भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा.
एजाज मुतवल्ली,मॅनेजिंग डायरेक्टर