ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये जलशक्ती अभियानाच्या कामाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१७ : जलशक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या क्षेत्रीय कामांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीचे केंद्रीय पथक अक्कलकोट मध्ये दाखल झाले होते.यावेळी त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या १ कोटी ७५ लाखांच्या कामाची पाहणी केली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात ७५ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यापैकी अक्कलकोट तालुक्यात १६ जुन्या पाझर तलावाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यापैकी पाच तलाव पूर्ण झाले असून अकरा तलावाचे काम प्रगतिपथावर आहे.ती ही कामे एक महिन्यात पूर्ण होतील,असे उपविभागीय जलसंधारण अधिकारी राहुल क्षिरसागर यांनी सांगितले.सदरचा निधी हा राज्य सरकारकडून मंजूर झाला आहे.आज अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचा दौरा झाला.उद्या (शनिवारी) सांगोला,पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्याचा दौरा ही समिती करणार आहे.आज झालेल्या अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यात बऱ्हाणपुर,चप्पळगाव, डोंबरजवळगे येथील पाझर तलाव दुरुस्ती व इतर कामाची पाहणी त्यांनी केली आणि समाधान व्यक्त केले.
यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण विभागाचे संचालक प्रशांत अग्रवाल,केंद्रीय जलभूमी व संशोधन संस्था पुणेचे वैज्ञानिक भूषण तावडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी अण्णासाहेब कदम, जलसंधारण अधिकारी अक्षय काळे, अक्कलकोट उपविभागाचे ज्ञानेश्वर वेदपाठक आदी उपस्थित होते.

भूजल पातळी
वाढणार

अक्कलकोट तालुक्यात मंजूर झालेल्या १६ कामांमुळे परिसरातील भूजल पातळी नक्कीच वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याबरोबरच उत्पन्न देखील वाढणार आहे. सर्व कामे एक महिन्यात पूर्ण करण्यात येतील.

राहुल क्षिरसागर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी,सोलापूर

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!