१९ ते २३ जानेवारी दरम्यान होणार अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल ! ग्राहकांना मिळणार विविध वस्तूंवर आकर्षक सूट
अक्कलकोट, दि.१३ : सालाबादाप्रमाणे याहीवर्षी अक्कलकोट डीलर्स असोसिएशन आयोजित अक्कलकोट ग्रँड फेस्टिवल दि.१९ ते २३ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती अध्यक्ष दिनेश पटेल व सचिव गजानन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.कोरोनामुळे दोन वर्ष हा फेस्टिवल होऊ शकला नाही यावर्षी मात्र निर्बंध उठवण्यात आल्याने पुन्हा भव्य स्वरूपात हा फेस्टिवल होणार आहे.
याचे उद्घाटन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची उपस्थिती राहणार आहे.
या फेस्टिव्हलमध्ये इलेक्ट्रिक वस्तू,मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सोलार, शेती विषयक अवजारे, बिल्डिंग मटेरियल, सीसीटीव्ही कॅमेरे, शिलाई मशीन, वॉटर फिल्टर आदि विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.याचा शुभारंभ १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जुना पावर हाऊस अक्कलकोट येथे होणार आहे.
या भव्य अशा फेस्टिवलमध्ये एकूण ४०
स्टॉल असणार असून याचे बजाज फायनान्स सहप्रायोजक आहेत.यात अक्कलकोट तालुक्यातील व्यापारी वर्ग व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा.सोलापूरपेक्षा कमी दरात प्रत्येक वस्तूंच्या खरेदीवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.याठिकाणी ऑनलाइन पेक्षाही कमी दरात वस्तू उपलब्ध होणार आहेत.आकर्षक गिफ्ट ठेवण्यात आले आहे.तिकीट विक्रीवरती सुद्धा लकी ड्रॉ कुपन ठेवले आहे.यातून भाग्यवान विजेत्यास भेटवस्तू मिळणार आहे.शून्य टक्के व्याजदरात या सर्व वस्तू उपलब्ध होतील. तसेच काही वस्तूंचे लाईव्ह डेमो देखील पाहायला मिळतील,अशी माहिती पाटील यांनी दिली.हे फेस्टिवल १९ ते २१ जानेवारी दरम्यान दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत तर २२ जानेवारी व २३ जानेवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.या पत्रकार परिषदेस राजशेखर हिप्परगी, डॉ.विपुल शहा, चेतन साखरे,नितीन पाटील, विकास जकापुरे, वैजिनाथ तालिकोटी, पराग पाटील,राजकुमार कोकळगी, सतीश शिंदे ,हनालाल मुल्ला,दिलीप महिंद्रकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.