ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वतःच्या मुलाच्या लग्नात सामाजिक जाणीवेतून पाच मुलींचा विवाह;अक्कलकोटच्या अशपाकभाई बळोरगी यांचा नवा आदर्श

 

अक्कलकोट, दि.१८ : स्वतःच्या मुलाच्या लग्नात गोरगरिबातील पाच मुलींचे लग्न लावून अक्कलकोट नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अशपाकभाई बळोरगी यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.आपल्या मुलाचे तर लग्न होणारच होते परंतु याच लग्नामध्ये गरिबांना दिलासा दिला तर आणखी चांगले होईल,हा उदात्त हेतू मनात ठेवून हा उपक्रम त्यांनी राबविण्याचे ठरवले आणि त्या दृष्टीने
पावले टाकत हा सोहळा घडवून आणला.अक्कलकोट नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून अशपाकभाई बळोरगी हे
परिचित व्यक्तीमत्व.गेली अनेक वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे ते कट्टर समर्थक आहेत.आपला मुलगा मुस्तफा यांच्या विवाह सोहळ्याचे टिनवाला फंक्शन हॉल येथे आयोजन करण्यात केले होते.या सोहळ्यामध्ये हा सामूहिक विवाह करत त्यांनी वेगळा आदर्श सर्वांना घालून दिला आहे .या सोहळ्यामध्ये मुलीच्या विवाहासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व गोष्टी या स्वखर्चातून त्यांनी या जोडप्यांना दिल्या आहेत. त्यामुळे खास करून मुस्लिम समाजातील मान्यवरांकडून तसेच समाजातील विविध घटकांकडून त्यांच्याबद्दल कौतुक होत आहे.यावेळी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे,आमदार सचिन कल्याणशेट्टी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे,जेष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,माजी आमदार धनाजी साठे,रामहरी रुपनवर,स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अमोलराजे भोसले,वटवृक्ष
देवस्थानचे महेश इंगळे,मोहोळचे अजिंक्यराणा पाटील,रोहन परिचारक,सुधीर खरटमल,संजय हेमगडडी,
आरिफ शेख,पुणे महापालिकेचे उपायुक्त आशा राऊत,त्रिंम्बक ढेंगळे पाटील,डॉ.सुवर्णा मलगोंडा,संजय देशमुख,दिलीप सिद्धे,रईस टिनवाला,बसलिंगप्पा खेडगी,महेश हिंडोळे,मिलन कल्याणशेट्टी,लाला राठोड,अजमेर दर्गा ट्रस्टचे खादीब अलीभाई शेख,उद्योगपती नासीर सरकार आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.या सोहळ्यासाठी माजी
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांनी दूरध्वनीवरून बळोरगी
यांना शुभेच्छा दिल्या.या विवाह सोहळया दरम्यान उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत आयोजक अशपाक बळोरगी व एजाज बळोरगी यांनी केले.समाजात अनेक लोकांचे शाही विवाह होतात परंतु गोरगरिबांचे दुःख जाणून घेऊन आपण त्यांना काहीतरी मदत करावी आणि त्यांच्या संकटाला धावून जावे
हा त्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता त्यामुळेच आम्ही पाच मुलींचा विवाह आमच्या लग्नात करून द्यायचे ठरवले होते,असे बळोरगी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!