प्रा. श्रीमंत बुक्कानुरे यांनी दिला कृतीतुन विधायक संदेश.. इकोफ्रेंडली गणेशमूर्तीचे घरीच केले विसर्जन
अक्कलकोट (प्रतिनिधी) नेहमीच पर्यावरण जपण्याची भूमिका घेणारे अक्कलकोट च्या सी. बी. खेडगी महाविद्यालयातील प्रा. श्रीमंत बुक्कानुरे यांनी गणेश उत्सव देखील पर्यावरणपूरक साजरा केला. इकोफ्रेडली गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गुरुवारी घरीच बादलीला सजावट करून शुद्ध पाण्याचे प्रतीकात्मक विसर्जनस्थळ तयार करून विधिवत विसर्जन केले. यामुळे पर्यावरण जपण्याचा सल्ला देण्याबरोबरच बाहेरील अशुद्ध, गढूळ पाण्यात विसर्जनामुळे होणारे गणरायाचे अवमूल्यन टाळून घरच्या घरीच शुद्ध पाण्यात कुटुंबासोबत विसर्जन करून गणेशमूर्तीचे पावित्र्य जपण्याची विधायक भूमिका बुक्कानुरे परिवाराने जपली आहे. या कल्पनेसाठी त्यांना पत्नी सौ. कावेरी, मुले संकल्प आणि उत्कर्ष यांनी उद्युक्त केल्याचे प्रा. बुक्कानुरे यांनी सांगितले.
अक्कलकोट येथील पुकाळे प्लॉट परिसरात राहणारे प्रा. बुक्कानुरे यांच्या या अनोख्या विधायक उपक्रमावेळी प्रा. संजयकुमार कलशेट्टी, प्रा. शरणप्पा अचलेर, प्रा. शिवाजी धडके, प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. निळाप्पा भरमशेट्टी, सुनील शिंदे, व पुकाळे प्लॉट परिसरातील बालगोपाल उपस्थित होते.