ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उच्च शिक्षणाबरोबर मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे;अक्कलकोट येथे समर्थ प्रतिष्ठान तर्फे गुणवंतांचा सत्कार

 

 

अक्कलकोट,दि.२१ : प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याबरोबरच चांगले संस्कार देणे काळाची गरज आहे,असे प्रतिपादन प्रा.भिमाशंकर बिराजदार यांनी केले.
अक्कलकोट येथील समर्थ प्रतिष्ठान तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.हा कार्यक्रम
श्री मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट
येथे पार पडला.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश हिंडोळे, नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, भाजपा ज्येष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी, शिवशरण वाले, श्रीमती मलम्मा पसारे, प्रांतपाल ला.राजशेखर कापसे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे व्हा.चेअरमन राजशेखर हिप्परगी, शिवकुमार कापसे, प्रशांत लोकापुरे, सुनिल गोरे, बाजार समितीचे संचालक बसवराज माशाळे, रजाक सय्यद, प्रशांत शिंपी आदी उपस्थित होते.पुढे बोलताना बिराजदार म्हणाले, सध्या स्पर्धात्मक प्रत्येक विद्यार्थ्यांनी हिरहिरीने सर्व क्षेत्रात भाग घेतले पाहिजे. विजयाचा आनंद, पराजयाला निराश न होता, प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. एक दिवस यश तुमच्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महेश हिंडोळे म्हणाले, समर्थ प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याबरोबरच गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम करीत असते. कोरोना काळात हे बंद होते.यंदाच्या वर्षापासून पुन्हा ते चालु करण्यात आले असून समाजाचे ऋण फेडण्यासाठी काही तरी आपण देणे लागतो या भावनेतून कार्य सुरू आहे.यावेळी प्रा.रेवणप्पा पाटील, नरेश कल्लुरकर, श्रीकांत झिपरे, राजकुमार एकबोटे, संजीव चनशेट्टी, कल्याणी पाटील, सचिव दयानंद बिडवे, उपाध्यक्ष संतोष घिवारे, अनिल बिडवे, रवि वाघमोडे, जगदीश शेटे, कांतु धनशेट्टी, शिवानंद भालके यांच्यासह विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी नीट परिक्षेमध्ये ७२० पैकी ६८५ गुण मिळविणार्‍या कु.गिरीजा शिंदे, ७२० पैकी ६३० गुण मिळविणार्‍या कु.माळी यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले तर आभार पार्वती संगापुरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!