गुरुपौर्णिमा उत्सव काळात भाविकांना चांगली सेवा द्या;उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी घेतली बैठक
अक्कलकोट, दि.२२ : गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांनी अक्कलकोट येथे नियोजनासाठी महत्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी उत्सव काळात येणाऱ्या अडचणी आणि भाविकांना मिळणाऱ्या सुविधा या बाबींचा आढावा घेत वाहतुकीतील सुधारण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
यात मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.बैठकीमध्ये आषाढी वारीसाठी आलेले भाविक वारीनंतर श्री स्वामी समर्थ दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.त्यामुळे शहरात छोटे -मोठे वाहन
मंदिर परिसराकडे येऊन गर्दी करणार नाहीत.
त्या अनुषंगाने नगरपालिकेकडून अक्कलकोट शहरातील महत्वाच्या ठिकाणी मजबुत स्वरूपाचे बॅरेंगेटिंग करण्यात यावेत.कमलाराजे चौक, फत्तेसिंह चौक, कारंजा चौक, मैंदर्गी नाका,भक्त निवास हत्ती तलाव,समाधी मठ
या ठिकाणी लाकडी बॅरेंगेटिंग करून दुचाकी वाहन मंदिर परिसर किंवा समाधी मठ परिसराकडे येणार नाहीत.याबाबत दक्षता घेणेबाबत मुख्याधिकारी सचिन पाटील यांना सुचना केल्या.तसेच श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर,अन्नछत्र मंडळ, भक्तनिवास, मैंदर्गी नाका,या ठिकाणी वाहनांची गर्दी न होता भाविकांना दर्शन घेणे सुलभ होईल कोणताही त्रास होणार नाही या दृष्टीने मंदिर परिसरात चारचाकी वाहने येणार नाहीत ते बाह्य वळणाने(बायपासने) बाहेरच जातील छोट्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कमलाराजे चौक , हत्ती तलाव जवळ बासलेगाव रोड, श्री स्वामी समर्थ दवाखाना मैंदर्गी रोड,अन्नछत्र मंडळ याच ठिकाणी करण्यात आलेले आहे.
अन्नछत्र मंडळात असलेली पार्किंग व्यवस्था
मैंदर्गी रोडच्या बाहेर पडणाऱ्या गेट मधुनच प्रवेश करेल आणि तेथुनच बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,असे अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त
अमोलराजे भोसले यांनी सांगितले.मंदिर समिती आणि अन्नछत्र मंडळ यांना यामावार यांनी मंदिरातील दर्शन रांग, भाविकांना रांगेत पिण्याची पाण्याची व्यवस्था,उन्हात जास्त वेळ थांबावे लागले तर बाहेरील दर्शन रांगेत मंडपची व्यवस्था करण्यात यावी,अशी सूचना केली.त्यावेळी मंदिर समितीचे
अध्यक्ष महेश इंगळे यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील,असे सांगितले.बैठकीला नायब तहसीलदार
विकास पवार,मुख्याधिकारी सचिन पाटील,पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी , देवस्थानचे महेश इंगळे,अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले,सचिव
शाम मोरे, विद्युत महावितरणचे अभियंता माडेकर ,कार्यालयाचे धनराज शिंदे, गोपनीय कर्मचारी शरद चव्हाण, गजानन शिंदे आदी उपस्थित होते.