तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.२६ : एस.पी इन्स्टिट्यूट ऑफ न्युरोसायन्सेस आणि लायन्स क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.यात तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली.शहाजी हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित शिबिराचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलित करून लायन्स क्लबचे झोन चेअरमन महेश नाळे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी लायन्स क्लब अध्यक्ष शिरीष पंडित यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर महाराष्ट्र राज्य निमा संघटनेचे अध्यक्ष
डॉ.टेंभुर्णीकर यांनी शिबिर आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली.यावेळी डॉ.अश्विन वळसंगकर,डॉ.
सोनाली वळसंगकर यांनी मार्गदर्शन केले.
या शिबिरात फिट्स, लकवा, डोकेदुखी, मानदुखी, मणक्यांचे आजार, ब्लडप्रेशर, डायबिटीस यांची मोफत तपासणी केली गेली.या कार्यक्रमाला लायन्स क्लब ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र हत्ते, उपाध्यक्ष सुभाष गडसिंग, सचिव विठ्ठल तेली,अककलकोट निमा अध्यक्ष डॉ. प्रदीप घिवारे, प्रभाकर मजगे ,मल्लिनाथ साखरे ,सुधीर माळशेट्टी , बाबासाहेब निंबाळकर ,गौरीशंकर चनशेट्टी, प्रकाश पाटील ,संतोष जिरोळे, मल्लिनाथ मसुती, सिध्दाराम मठ यांच्यासह इन्स्टिट्यूट अधिक्षक मनिषा माने ,डॉ.आसावरी पेडगावकर ,डॉ. गिरिश साळुंके ,डॉ.
बोकडे ,डॉ .बोरगांवकर ,डॉ .सातवेकर , सोलापूर मिडटावून लायन्स क्लब अध्यक्ष बंडेवार, मुख्याध्यापक शिवाजी भांगरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, नगरसेवक सलिम येळसंगी, सुधाकर गोंडाळ आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन सुभाष गडसिंग यांनी केले तर आभार विठ्ठल तेली यांनी मानले.