स्थानिकांना वाव मिळण्यासाठी व्यापाऱ्यांनी घेतला अनोखा निर्णय, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट व्यापारी महासंघाची भूमिका जाहीर
अक्कलकोट, दि.८ : यंदा पावसाअभावी
भीषण दुष्काळी परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील व्यापाऱ्यांना सहकार्य मिळावे यासाठी
स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच ग्राहकांनी खरेदी करावे,असा अभिनव उपक्रम अक्कलकोट व्यापारी महासंघाने घेतला आहे.या संदर्भातील माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मल्लिनाथ साखरे व सचिव नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.सध्या अनेक व्यापारी हे लाखो रुपयाचे भांडवल गुंतवून व्यवसाय करत आहेत.जर ग्राहकांनी काही वस्तू ऑनलाइन खरेदी केल्या तर त्याचा फटका हा व्यापाऱ्यांना बसू शकतो म्हणून व्यापारी महासंघाने ही
भूमिका घेतली आहे,असेही साखरे यावेळी म्हणाले.इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल्स, मोबाईल,क्लॉथ, स्टेशनरी,सराफ,बिल्डींग मटेरियल, मशिनरी,ऑटोमोबाईल,
खत -औषध विक्रेते,भांडी,फर्निचर या सर्व क्षेत्रातील वस्तूंची विक्री अक्कलकोटमधून करावी. जेणेकरून आपल्या माणसाला सहकार्य केल्यासारखे होईल आणि आपला पैसा आपल्या तालुक्यात राहील. तसेच व्यापारी बंधूंच्या व्यवसाय वाढीस आपले सहकार्य लाभेल,असे गजानन पाटील यांनी सांगितले.ऑनलाइन पेक्षा कमी दरात वस्तू खरेदी करून स्थानिक व्यापाऱ्यांचे हात बळकट करावे .स्थानिक बाजारपेठेत सुद्धा कॅशबॅक ऑफर,आणि आकर्षक
भेट वस्तू, खरेदी करून आनंद द्विगुणीत करावा,असे नितीन पाटील यांनी सांगितले. दोन वर्षापासून अक्कलकोट शहरामध्ये व्यवसाय वाढीला चालना मिळावी यासाठी ग्रँड फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते या फेस्टिवलला देखील तालुक्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे
त्याच धर्तीवर या दिवाळीला व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे,असे दिनेश पटेल यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, सचिव
नितीन पाटील, दिनेश पटेल ,गजानन पाटील ,
इब्राहिम कारंजे, विकास जकापुरे, राजू लोखंडे,निनाद शहा प्रकाश उणद,सागर दोशी, विजयकुमार कुलकर्णी,रामेश्वर पाटील, बंटी कलशेट्टी,राजू कोकळगी,हनालाल मुल्ला,
प्रकाश घिवारे ,नितीन महाडकर,दिलीप महिंद्रकर,समर्थ मसुती,शिवशरण जोजन, स्वामीनाथ आलदी,राजशेखर सोडडे,राजू भुजंगे,रणसुभे,विनायक बुदले,प्रमोद पाटील आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.