अक्कलकोट, दि.७ : हत्ती रोगाकडे वेळीच लक्ष दिल्यास व योग्य निदान केल्यास त्याची तीव्रता कमी होऊ शकते,असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ.समाधान देवोजी यांनी केले.सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हत्तीरोग नियंत्रणपथकाच्यावतीने मार्गदर्शनपर
शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.सहसंचालक डॉ.प्रतापसिंह सारणीकर व अक्कलकोटचे सहा.संचालक डॉ.कमलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनुसार अक्कलकोट अंतर्गत हत्तीरोग नियंत्रण पथकाच्यावतीने हत्तीपाय रुग्ण, अंडवृध्दी रुग्ण यांना हत्तीपायाची काळजी व निगा राखणे याबाबत जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ.समाधान देवोजी, विभागीय किटक शास्त्रज्ञ सोमाजी अनुसे व प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी गिरीष सपकाळ यांनी आरोग्य कर्मचारी व हत्तीपाय रुग्ण यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी हत्तीपाय रुग्णांना आपल्या पायाचे निगा व काळजी कशाप्रकारे घ्यावी
याचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.
यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक राठोड, तसेच हत्तीरोग अधिकारी के.एस.मुंजळ,हत्तीरोग नियंत्रक पथकाचे शंकर कुंभार व त्यांचे पथक, अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी हत्तीरोग रुग्ण उपस्थित होते.