ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात अद्यापही १११.२३ कोटी रुपयांची थकबाकी,नऊ दिवसात दररोज १ कोटींपेक्षा जास्त वसुली : म्हेत्रे

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यात थकित वीज बिलापोटी शेतकऱ्यांकडे अजूनही १११. २३ कोटी रुपये थकबाकी आहे.२३ हजार ५३४ शेतीपंप ग्राहकाकडे ही थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे यांनी दिली आहे.

मध्यंतरी वसुली मोहीम तीव्र केल्याने काही प्रमाणात थकबाकी वसुली होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.अक्कलकोट तालुक्यामध्ये एकूण २३ हजार ५३४ शेतीपंपाचे ग्राहक असून त्यांच्याकडे एकूण २८३.९० कोटी वीज बिलाची थकबाकी आहे. कृषी धोरण २०२० नुसार १७२.६७ कोटी रुपयांची सूट त्यांना महावितरण कंपनीने दिली असून थकबाकी पोटी त्यांना आता १११.२३ कोटी रुपये वीज बिलाचा भरणा बाकी आहे. कृषी धोरण २०२० नुसार ऑक्टोबर २०२० पासून अक्कलकोट तालुक्यात ८ हजार ६८२ शेती पंप ग्राहकाने १०.७७ कोटी रुपये वीजबिल भरणा केला असून त्यामध्ये १ हजार ४७५ शेती पंप ग्राहकाने ४.२७ कोटीची संपूर्ण थकबाकी भरून डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण थकबाकी मुक्त झाले आहेत.दरम्यान अक्कलकोट विभागाने १६ मार्च ते २४ मार्च पर्यंत दररोज नऊ दिवस १ कोटी पेक्षा जास्त थकबाकी वसूल केली आहे.

कृषी धोरण २०२० योजनेस अक्कलकोटमधील शेतकरी हे प्रचंड प्रतिसाद देत आहेत त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना महावितरणतर्फे थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी धोरण २०२० योजनांमध्ये सहभाग घेऊन कृषी वीज बिल थकबाकी मुक्त करून घ्यावे, असे आवाहन संजीवकुमार म्हेत्रे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!